थोडक्यात
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते
बिहार मधील अनेक मतदारसंघांचा रोचक ट्रेंड
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून २४३ मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून प्राथमिंक कलांपासून बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू आघाडीवर आहेत. तर काँग्रेस आणि आरजेडी पिछाडीवर आहेत. मतमोजणीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे बिहारमध्ये कुणाचे सरकार येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान निवडणुकीच्या निकालापूर्वी बिहारमधील सहा मतदारसंघांत लागणाऱ्या निकालांचा अंदाज बांधला जात आहे. याचे कारण म्हणजे बिहारमधील या सहा मतदारसंघात १९७७ पासून एक वेगळाच पायंडा पडला आहे. या सहा मतदारसंघात जो पक्ष किंवा जी युती जिंकते तेच बिहारमध्ये सत्तेत येतात. त्यामुळे संपूर्ण बिहारचे या मतदारसंघाकडे लक्ष आहे. १९७७ पासून या मतदारसंघात पायंडा पडला आहे ते मतदारसंघ म्हणजे, केवटी, सहरसा, बरबीघा, मुंगेर, पिपरा, सकरा. या मतदारसंघात जे पक्ष किंवा युतीचा विजय होतो, तेच पक्ष बिहारमध्ये सत्तेत येतात, हा १९७७ पासूनचा इतिहास आहे.
बिहार मधील अनेक मतदारसंघांचा रोचक ट्रेंड; ‘सत्ताधारी ठरवणारे’ मतदारसंघ पुन्हा चर्चेत
बिहारमध्ये मतमोजणी सुरू असताना काही मतदारसंघांचा ऐतिहासिक ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरभंगा जिल्ह्यातील केवटी मतदारसंघ हा असा मतदारसंघ मानला जातो, ज्याचा निकाल राज्यातील सत्तास्थापनेवर परिणाम करणारा ठरतो. 2020 मध्ये येथे भाजपाचा विजय झाला आणि नंतर जदयूच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाले. अशाच प्रकारचा ट्रेंड सहरसा विधानसभा मतदारसंघातही दिसून येतो. येथे विजय मिळवणारा उमेदवार साधारणपणे सत्ताधारी पक्षाचाच असतो. 2020 मध्ये भाजपचे आलोक रंजन झा यांनी येथे विजय मिळवला होता.
बरबीघा विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रोचक आहे.
1977: जनता पक्षाचा विजय
2000 पर्यंत: काँग्रेसची सततची आघाडी
2020: जागा जेडीयूच्या वाट्याला
सकरा आणि मुंगेर या मतदारसंघांमध्येही असा ट्रेंड दिसतो — येथे विजयी झालेला पक्ष बहुतेक वेळा राज्यात सत्तेत आला आहे. मात्र 1985 च्या निकालाने हा ट्रेंड मोडला होता. पिपरा मतदारसंघात तर 1977 पासून अशीच परंपरा कायम असून, या मतदारसंघाचे निकाल राज्यातील सत्तेचे दिशानिर्देश ठरवतात, अशी धारणा आहे. या सर्व मतदारसंघांच्या ऐतिहासिक पॅटर्नमुळे मतमोजणीदरम्यान राजकीय वर्तुळात त्यांच्या निकालांविषयी विशेष उत्सुकता आहे.