ताज्या बातम्या

Amit Satam On Sharad Pawar : "यापेक्षा जास्त हास्यास्पद गोष्ट असू शकतं नाही" शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर अमित साटम यांच्याकडून प्रत्युत्तर

मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. यावर अमित साटम काय म्हणाले? जाणून घ्या...

Published by : Prachi Nate

आज मविआ आणि मनसेच्या पार पडत असलेल्या सत्याच्या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. यावेळी ते म्हणाले होते की, "तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजुट दाखवली... अशी अडचण 79 काळात आली होती. महाविद्यालयात शिकत असताना. संयुक्त मोर्चासाठी लोक आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती. तशी आजची चळवळ. आजची एकजुट बघून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली..." यावर भाजपचे नेते अमित साटम यांनी भाजपच्या मुक आंदोलनात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी केलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्द्यावर बोलताना अमित साटम म्हणाले की, "यापेक्षा जास्त हास्यास्पद गोष्ट असू शकतं नाही, ही चळवळच काँग्रेस विरोधात होती, आणि आज त्यांचेच नेते स्टेजवर येऊन याविषयी बोलत आहेत. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती..."

पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करत अमित साटम म्हणाले की, "मुंबईला वाळवी सारखं कोणी खाल्ल? कमिशनर चालणारे, मातोश्री 2 बनवणारे कोण? हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती. मुंबईच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे टाकले असतील त्याचा OTP आला असेल... आपण हरणार हे त्यांना माहीत, त्यांना एक भोपळा मिळणार म्हणून पुढे निवडणुका घ्या म्हणता, पण नंतर पण दोन भोपळेच मिळतील. ते वैफल्य ग्रस्त झालेत, मुख्यमंत्री असताना 90 टक्के आमदार आपल्याला सोडतात, देशात असे कधी घडलं नाही. माझं ओपन चॅलेंज त्यांनी मुंबईकरांसाठी केलेलं काम दाखवाव..."

राज ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले की, "टीआरपी मिळवण्यासाठी हे सगळ सुरु आहे, एक महाराष्ट्राच्या विदूषकाने ब्रेक घेतला त्यानंतर आता मिमिक्री आर्टिस्टने हातात सूत्र घेतली आहेत. त्यांना विचारत का नव्हते, त्यांना राज ठाकरेंसोबत स्टेज शेअर करायचं नसेल, महाविकास आघाडीत फूट पडली आहे. ही लोक फेक नेरेटिव्ह करून आता जनतेचा विश्वास जिंकू शकत नाही".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा