ताज्या बातम्या

Sharad Pawar : सरकारविरोधात राष्ट्रवादी SP ची ‘काळी दिवाळी' यावर काय म्हणाले पवार ?

“महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर झाला. काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्धवस्त झाली. शेती नुसती उद्धवस्त झाली नाही, तर पीक ज्या जमिनीत यायचं ती जमीनच खरडून गेली.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • सरकारविरोधात राष्ट्रवादी SP ची ‘काळी दिवाळी'

  • ‘हा निर्णय मी घेऊ शकत नाही’

  • ‘शेतकऱ्याला, जमीन मलाकाला उद्धवस्त करुन चालणार नाही’

“महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर झाला. काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्धवस्त झाली. शेती नुसती उद्धवस्त झाली नाही, तर पीक ज्या जमिनीत यायचं ती जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्याचं सर्वस्व आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार, म्हणून त्याच्या या दु:खात सहभागी होण्याचा आमच्या संघटनेने निर्णय घेतला” असं शरद पवार म्हणाले.”संकटं येतात पण अशावेळी ज्यांच्या हाताता देशाची, राज्याची सत्ता आहे, त्यांची संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हाताभार लावायची जबाबदारी असते. आता राज्य सरकारने काही तोकडी रक्कम जाहीर केली. पण नुकसानीच स्वरुप बघितल्यावर या तोकड्या रक्केमेचा उपयोग त्याला पुन्हा उभ करण्यासाठी होईल असं वाटत नाही” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी नोंदवलं.

“त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त नाराज आहे. माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. इथे मी राजकारण आणू इच्छित नाही. पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा ही केली पाहिजे. मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने आजचा दिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय आमच्या संघटनेने घेतला आहे. हे जे काही घडतय ते दु:खद आहे. त्यावर अधिक भाष्य नको” असं शरद पवार म्हणाले.

पुरदंरमध्ये शेतकऱ्यांनी त्यांना मोबदला जाहीर झाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली, त्या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं. “मोबदला हा विषय नाही.त्यांनी जो विषय मांडला. त्याचं म्हणणं होतं की जागाच बदला. हा निर्णय मी घेऊ शकत नाही. केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे. जर विमानतळ कुठे करायचा हा निर्णय केंद्र सरकार घेईल. जिथे विमानतळ होईल, त्या शेतकऱ्याची शेती ताब्यात घेतली जाईल. त्यांच पुनर्वसन, नुकसानभरपाई कशी द्यायची या संबंधी शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. त्यामुळे विरोध सुद्धा आहे”

“कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे सगळ्याचं म्हणणं असेल, तर ज्या जागेवर होणार त्या भागातल्या शेतकऱ्याला, जमीन मलाकाला उद्धवस्त करुन चालणार नाही. योग्य नुकसानभरपाई, पर्यायी जमीन द्यावी ही त्यांची मागणी आहे. मी त्यांना सांगितलय की, यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करणार आहे. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन” असं शरद पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा