सध्या राज्यात मविआ आणि मनसेनं निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न आणि आयोगानं दिलेल्या उत्तरांची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तीकीटासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यातच एकत्र की एकला चलोरेचा नारा देत राजकीय पक्ष या निवडणूकांना सामोरे जाणार हे काळच ठरवेल.
तत्पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई. कारण देशाचं अर्थकारण हे महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या आसपास फिरत असतं. याच मुंबई महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार याचे दावे प्रतिदावे केले जात असताना. मुंबईचा किंग कोण ठरवणार तर अर्थातच मुंबईकर मतदार राजा. मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे? मुंबईकरांचा कौल कुणाला? मुंबईकरांवर विविध राजकीय समिकरणांचा महायुती महाआघाडीचा किती परिणाम होणार?
मुंबईतील बहुभाषीक मतदार, निवडणूकीतील स्थानिक मुद्दे, राजकीय पक्षांची उमेदवार निवड, यावर मुंबईचा निकाल अवलंबून असणारे. त्यासाठी मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे. निवडणूकांचे निकाल कसे असतील. काय सांगतोय लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा ओपिनीयन पोल, पाहूयात आजच्या भागात...