ताज्या बातम्या

'शस्त्रसंधीच काय झालं', ओमर अब्दुल्ला यांचा सवाल; अवघ्या तीन तासांच्या आत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण निवळण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्ताननं शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.

Published by : Rashmi Mane

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण निवळण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्ताननं शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले आहेत. तर काही ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.

काय घडतंय

उधमपूरमध्ये ब्लॅकआउट. दरम्यान, भारताच्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोन रोखले तेव्हा लाल रेषा दिसल्या आणि स्फोट ऐकू येत आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

राजस्थानमधील बाडमेर शहरात पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट दरम्यान भारताच्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोन रोखले. तेव्हा लाल रेषा दिसल्या आणि स्फोट ऐकू आले.

पंजाबमधील पठाणकोटमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

पंजाबमधील मोगा येथे संपूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स पोस्ट करत, शस्त्रसंधीचं काय झालं?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 'श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले', असेही त्यांनी नमूद केले आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांची ठिकाणं एअर स्ट्राईकनं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर विविध ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले सुरू केले. त्याला भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दरम्यान, भारताच्या हल्ल्यांनी जेरीस आलेल्या पाकिस्तानने गुडघे टेकले. त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर भारतानेही शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. मात्र काही तासांतच पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू