लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडत आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचपार्श्वभूमिवर "आमचं रुग्णालय हे गरिबांसाठी असून, त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य असल्याच" महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.
मंत्री प्रकाश आबिटकर यांचा अजेंडा काय? काय म्हणाले मंत्री प्रकाश आबिटकर जाणून घ्या...
महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर मुलाखती दरम्यान म्हणाले की, "महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा आरोग्य सुदृढ राहणं आणि त्यासाठी ज्या ज्या उपयोजना करायच्या आहेत, त्यासाठी अर्थसंकल्पातून अतिशय महत्त्वाचा बजेट उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचं आहे. सर्वांची उत्तम आरोग्य परिस्थिती महाराष्ट्रात असली पाहिजे, हेच विजन घेऊन आपण कामाला लागत आहोत. आरोग्य विभागाची जी काही आपली यंत्रण आहे, ती साचेबद्ध पद्धतीने निघाली आहे. राज्याचा बजेट असेल किंवा सर्व सुविधा उपलब्ध करून देणे असेल. या सर्व गोष्टींसाठी हेल्थ पॉलिसी असणे महत्त्वाचा आहे. जे काही अजेंडावरचे विषय आहेत त्यासाठी आपले धोरण उत्तम असावी, यासाठी आम्ही काम करत आहोत. लवकरच या सगळ्याचं सादरीकरण होईल". असं प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.
"आमचं रुग्णालय हे गरिबांसाठी, त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य"
सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय यांच्याबद्दल बोलताना पुढे प्रकाश आबिटकर म्हणाले की, "खरं तर डेडिकेटली काम करण्यासाठी आम्ही खूप चांगलं यंत्रणा राबवत आहोत. राज्य मॉनिटरिंग करणं हे राज्य सरकारचा आणि आमच्या विभागाचे काम आहे. राज्याचा मंत्री हा प्रत्येक वेळेला एकेका हॉस्पिटलमध्ये जाईल आणि आपली जीएसओपी आहे, त्यानुसार काम होतं की नाही हे पाहतील. स्वच्छतेसाठी आम्ही खूप चांगले पैसे खर्च करत आहोत. त्याचसोबत राज्यातील दोन कोटी महिलांच्या आरोग्य तपासण्या आपण करत आहोत. अशा सर्व दोन कोटी महिलांच्या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तपासण्या होतील. त्यासोबतच त्याच्यावर जे उपचार होतील ते सुद्धा मोफत राज्य सरकारच्या वतीने होतील. त्या शंभर दिवसांच्या निमित्ताने जे काम सुरू केले आहे ते पुढील टप्प्यात अधिक गतीने करता येईल", असं प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.
पॉलिसी आणि पुढील ॲक्शन प्लॅन बद्दल प्रकाश आबिटकर काय म्हणाले?
पॉलिसी आणि पुढील ॲक्शन प्लॅन बद्दल बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, "आपल्याकडे अनेक हॉस्पिटल आहेत, त्याचा जर विचार केला तर हेल्थ टुरिझमचा उपयोग अनेक देश-विदेशात सुरू आहे. त्यासोबत टुरिझमची कन्सेप्ट आहे त्याचा सगळ्याचा उपयोग यामध्ये होईल. राज्याच्या अर्थकारणामध्ये याचा येत्या काळात मोठा वाटा असेल".
तसेच पुढे ॲक्शन प्लॅन बद्दल आबिटकर म्हणाले की, "मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये मला ही कामाची संधी मिळाली. सध्या पाच विषयांवरती आमचं डिपार्टमेंट काम करत आहे. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट लॉ हा त्याच्यातला पहिला मुद्दा आहे, यामध्ये सर्व खाजगी हॉस्पिटलची नोंदणी होणार. सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्व सुविधांचे दर आहेत, त्याचं कामकाज कशा प्रकारे करावं या संदर्भात तरतूद केली आहे. पण त्याचे पालन होत नाही. जर त्याकडे लक्ष दिल तर त्याचा चांगला उपयोग होईल. त्यासोबतच खाजगी लॅबोरेटरीवर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे हा आपला दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे, राज्यात आपण ज्या प्रकारे रक्त दान करत आहोत त्यामध्ये अधिक पारदर्शकता आली पाहिजे".
"अत्यंत चांगल्या पद्धतीने मोफत रक्त मिळण्यासाठी राज्य रक्त संकलन करत आहोत. त्यानंतर स्त्रीभ्रूणहत्या यामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी भविष्यात गंभीर समस्या धारण होईल. तेव्हा त्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी भेटून प्रभावीपणे काम करत आहोत. संदर्भातील महिला असेल किंवा जो खबरी असेल त्याला एक लाख रुपयांचा इनाम देऊन आपण त्या कायद्याचा प्रभावी वापर करता येईल का? हे आम्ही करत आहोत. अशा अनेक गोष्टी या आरोग्य क्षेत्राशी निगडित आहेत त्या गोष्टी करत आहोत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली".