ताज्या बातम्या

Maharashtra Election : निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय? नेमकं कारण काय ?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय?

  • शिष्टमंडळाच्या निवेदनात काय?

  • निवडणूक आयोग बैठकीत राज ठाकरे काय काय म्हणाले?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. काल (14 ऑक्टोबर) विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं.

दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील. या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय?

  • निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा

  • लोकशाही बळकट करण्यावर चर्चा

  • स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी

  • महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी

शिष्टमंडळाच्या निवेदनात काय?

  • निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका

  • खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे

  • लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?

  • एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितले जात नाही?

  • निवडणूक आयोगाने नावं,त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावी

  • विधानसभेला वापरलेली ऑक्टो 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही?

  • मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे

  • काही राजकीय छुपे हेतू मतदार यादी लपवण्यात आहेत की, कोणाचा दबाव आहे?

निवडणूक आयोग बैठकीत राज ठाकरे काय काय म्हणाले?

  • मतदान नोंदणी निवडणूक लागलेली नाही तरी बंद का केली ? - राज ठाकरे

  • जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? - राज ठाकरे

  • दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव - राज ठाकरे

  • मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ - राज ठाकरे

  • वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी - राज ठाकरे

  • निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? - राज ठाकरे

  • 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? - राज ठाकरे

  • व्हिव्हिपॅट मशीन लावा - राज ठाकरे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा