विधानसभा निवडणुकीत महायुतीतील इतर दोन्ही पक्षांपेक्षा भाजपाने सर्वाधिक जागा घेतल्या... त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला तर आहेच. पण, बार्गेनिंग पॉवरही वाढलीय. म्हणूनच, भाजपचे नेते शत प्रतिशत भाजपचा नारा देऊ लागले आहेत. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात.
त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आता प्रामुख्याने पुणे महापालिका चर्चेत आली आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचा महापौर झाला. मात्र आता पुणे महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून, पुणे महापालिकेत भाजप 105 पेक्षा अधिक जागा लढेल आणि भाजपचाच महापौर होईल असा दावा भाजपने केला आहे.