ताज्या बातम्या

WhatsApp Update : स्टेटसवर आता गाणे जोडा,व्हाट्सॲपचं नवं फिचर काय?

व्हाट्सॲपच्या नवीन अपडेटमुळे आता स्टेटसवर गाणे जोडता येणार आहे. जाणून घ्या कसे डाऊनलोड करायचे आणि नवीन फीचर्सचा वापर कसा करायचा, तसेच मित्र-मैत्रिणीला टॅग करण्याचे फिचर कसे वापरावे.

Published by : Team Lokshahi

सध्याच्या चालू पिढीला सर्व काही सोशल मीडियावर दाखवून करायचे असतो. सोशल मीडियाच्या स्पर्धेतेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक सोशलमीडिया ॲप सातत्याने नवे फिचर आणून युजरला काही तरी नवीन देत असते. युजरला आपल्याकडे आकर्षित करुन घेतले जाते. त्यामध्येच आता व्हाट्सॲप आपल्या युजरसाठी आता नवीन फिचर घेऊन आले आहे. पहिल व्हाट्सॲपने इन्स्टाग्रामप्रमाणे मित्र- मैत्रिणीला टॅग करण्याचे फिचर आणले होते. आता पुन्हा काहीतरी व्हाट्सॲप नवीन घेऊन आले आहे. काय आहे फीचर जाणून घेऊ या...

नवा फिचर कसा डाऊनलोड करायचा.

सर्वप्रथम व्हाट्सॲप ॲप गुगुल प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा. त्यानंतर तुमच्या व्हाट्सॲपवर फेसबुक , इन्स्टाग्रामप्रमाणे म्युझिक आयकॉन दिसू लागेल . त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो टाकून त्यावर आवडीचे गाणे सेट करु शकता. त्याचप्रमाणे स्टेटसच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात @ हे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला मित्र- मैत्रिणीला टॅग करता येईल. त्यामुळे आता व्हाट्सॲप इन्स्टाग्रामप्रमाणे काम करणार आहे.

व्हाट्सॲपचा स्टेट्स हाईड

बहुतेकवेळा आपल्या मनातील भावना काही नेमंका लोकांना सांगायच्या असतात. त्यावेळेस काय करावे हे समजत नाही. तेव्हा स्टेट्सच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. नंतर ज्या व्यक्तींना तुम्हाला हाईड करायचे आहे. त्यांच्या नावावर क्लिक करुन त्यांना हाईड करा. त्यामुळे हाईट केलेल्या व्यक्तींना तुमचा स्टेटस दिसणार नाही.

लॉक चॅट

अनेकवेळा कामाच्या ठिकाणी आपण व्हाट्सॲप लॉगिन करतो. त्यावेळेस आपली संपुर्ण चॅटलिस्ट समोर दिसते. अशावेळेस तुम्ही तुमचे वैयक्तिक चॅट लपवू शकतात. कसं ते जाणून घ्या...

सर्वप्रथम व्हाट्सॲप ॲप गुगुल प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा. त्यानंतर तुमच्या व्हाट्सअॅपवर नवीन फीचर येईल. ज्या व्यक्तीला हाईट करायचे आहे. त्याच्या नावावर क्लिक करुन तुम्हाला चॅट लॉकचा ऑप्शन येईल. त्यानंतर विशिष्ट कोड लावून लॉक करु शकतात. त्यामुळे तुमच्या चॅटलिस्टमध्ये त्या व्यक्तीचे नाव दिसणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद