ताज्या बातम्या

General Knowledge : भारतातील चलनी नोटांचा कागद कशापासून बनवला जातो? तुम्हाला माहिती आहे का ?

आपण ज्याला ‘चलन नोट’ म्हणतो, ती प्रत्यक्षात सामान्य कागदापासून बनलेली नसते. जर नोटा कागदाच्या असत्या, तर त्या पाण्यात भिजल्या असत्या किंवा लवकर फाटल्या असत्या.

Published by : Varsha Bhasmare

सामान्य कागदाचा वापर नाही

आपण ज्याला ‘चलन नोट’ म्हणतो, ती प्रत्यक्षात सामान्य कागदापासून बनलेली नसते. जर नोटा कागदाच्या असत्या, तर त्या पाण्यात भिजल्या असत्या किंवा लवकर फाटल्या असत्या.

100% कापूस

भारतीय चलनी नोटा बनवण्यासाठी 100% कापूस वापरला जातो. कापसाचे तंतू हे लाकडापासून बनवलेल्या कागदापेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात.

रसायने आणि तागाचे मिश्रण

कापसाच्या तंतूंमध्ये ‘सेल्युलोज’ नावाचा घटक असतो. नोटा बनवताना कापसामध्ये काही विशेष रसायने आणि तागाचे मिश्रण केले जाते, ज्यामुळे नोटांचा पोत अधिक मजबूत होतो आणि त्या लवकर खराब होत नाहीत.

बनावट नोटा ओळखणे

नोटा छापताना केवळ कापूस वापरला जात नाही, तर त्यात सुरक्षा धागा, वॉटरमार्क आणि इतर गुप्त चिन्हांचा समावेश केला जातो, जेणेकरून बनावट नोटा ओळखणे सोपे होते.

विशेष शाईचा वापर

नोटांवर छपाई करण्यासाठी खास प्रकारच्या शाईचा वापर केला जातो, जी नोटांना एक विशिष्ट स्पर्श देते. यामुळे अंध व्यक्तींनाही स्पर्श करून नोटा ओळखता येतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा