ताज्या बातम्या

Sanjay Raut : स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचं असं कोणतं राष्ट्रकार्य होत ? राऊतांचा सवाल

राष्ट्रकार्य यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं होतं, भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी हे एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीने झालं, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • राष्ट्रकार्य यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं होतं

  • डॉ. आंबेडकरांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊत म्हणाले

  • राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल

राष्ट्रकार्य यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं होतं, भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी हे एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीने झालं, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊत म्हणाले, गांधी किंवा डॉक्टर आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते असंही राऊत म्हणाले.

अतिवृष्टीचा फटका उभ्या महाराष्ट्राला बसला आहे. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी तर पावसामुळे उद्धव सेनेच्या दादर येथील शिवतीर्थावर पाण्याने चिखल झाला आहे. पाणी काढण्याचे आणि चिखल कमी करण्याचे काम सुरू असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनाचा दसरा मेळावा ही परंपरा आहे. ती कसोशीने पार पाडण्याचे काम करण्यात येत आहे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाला आहे. दाखल होत असल्याचे आणि सभेस्थळी पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर शिंदे सेनेकडून या परिस्थितीवर भाष्य करत उद्धव सेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून केवळ चिखलफेक होते. विचारांचं सोनं लुटल्या जात नसल्याचा टोला लगावण्यात आला. त्याला राऊतांनी खरमरीत उत्तर दिलं. ते म्हणालं की चिखल फेकणार आहोत. चिखल फेकायला पाहिजे. माहिती नसेल तर सांगतो या हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत, ज्याचा चिखलाशी संबंध आहे. शिमगा असेल, विदर्भातही असे काही सण आहेत. त्यांना (शिंदे गटाला) हिंदू संस्कृती माहितीच नाही. शिवपार्कातील चिखलात त्यांना लोळवावेच लागेल. असा पलटवार राऊतांनी केला आहे.

आम्हाला कधीच आव्हान नव्हतं. जर आव्हानं असतं तर आम्ही चिखलात कधी गेलोच नसतो. शिवतीर्थावरच मेळावा करायचा हा हट्ट आम्ही पुढं नेलाच नसता. निष्ठावंत शिवसैनिक उन, वारा, पाऊस, वादळ, चिखल तुडवीत येतील आणि विचारांचं सोनं घेऊन जातील. संध्याकाळी तुम्ही पाहा काय नजारा आहे तो. आधी निष्ठावंताचे मेळावे व्हायचे आता गद्दारांचे मेळावे होतायेत. या गद्दारांना मोदी-शहांचे पाठबळ आहे. त्यांच्या मदतीने त्यांनी शिवसेना चोरली असा आरोप राऊतांनी पुन्हा केला.

आजच्या दसऱ्या मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीवर नक्कीच भाष्य होईल. संदर्भ मिळतील. कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा संवाद आणि भेट झाली आहे. पण ताबडतोब काय भूमिका जाहीर अशी अपेक्षा आहे. पण तसं होत नाही. ग्राऊंड लेव्हलाला दोन्ही पक्षांच्या युतीचे काम सुरू झाले आहे. पण याअधिक याविषयी भाष्य आपण करू शकत नाही. ती भूमिका दोन्ही पक्षाचं प्रमुख मांडतील असं सूतोवाच राऊतांनी केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा