ताज्या बातम्या

Election commission : मतदार याद्यांवरील आक्षेपांचे काय करायचे? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय आयोगाला पत्र.....

मतदार याद्यांतील घोळाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच निवडणूक आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्र लिहून सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मांडलेले मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • मतदार याद्यांवरील आक्षेपांचे काय करायचे?

  • मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय आयोगाला पत्र

  • सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच हालचाली

मतदार याद्यांतील घोळाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच निवडणूक आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्र लिहून सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मांडलेले मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. आक्षेपांचे या काय करायचे, योग्य निर्देश याबाबत मिळावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

29 पालिका, 247 नगर पालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी 14 ऑक्टोबर रोजी माझ्या कार्यालयाला भेट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती, 18 वर्षे पूर्ण होणार्या नव्या मतदारांची नोंदणीबाबतच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत, असे चोक्कलिंगम यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून वापरल्या जाणार्या मतदार यादीत डुप्लिकेट नावे, मतदारांची नावे, वय आणि पत्त्यात मोठ्या प्रमाणात चुका आहेत. मतदार यादीतील काही त्रुटींबाबत प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनाची प्रत येथे जोडली आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीतील दुबार मतदारांची पडताळणी करून दुबार नावे रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणार्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रकाशित झालेली नाही. यामुळे राजकीय पक्ष किंवा नागरीक यांना निवडणूक यादीतील चुकांबाबतआक्षेप दाखल करण्याची संधी मिळाली नाही.

31 जानेवारी 2026 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याबाबत केलेल्या सूचना आवश्यक त्या योग्य निर्देशांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत असल्याचे चोक्कलिंगम यांनी या पत्रात पुढे म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा