आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष दिले जाणार आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
रोजगार क्षेत्रात काय मिळालं?
1. एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे टर्म कर्ज, एमएसएमईला सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणार
2. स्टार्टअपची 10 कोटींवरून 20 कोटींची क्रेडिट लिमिट
3. छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड
4. आयआयटींची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवल्या
5. ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदांनी होणार
6. उद्योगक्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसवर सर्वाधिक भर
7. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही
8. जन विश्वास विधेयक आणणार
9. 5.7 कोटी लघुउद्योग देशात येणार
10. लघुउद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध होणार, त्यातून 36 टक्के उत्पादन
11. 45 टक्के निर्यात सूक्ष्म व लघू उद्योगातून केली जाते.
12. सूक्ष्म व लघू उद्योगांचं वर्गीकरण होणार असून सूक्ष्म व लघू उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार.