Manoj Jarange's Daughter Warns the Government : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुन्हा हाक दिली आहे. जरांगे तोफ पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहे. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज सकाळी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव यांच्या उपोषणात सहभागी झाले आहेत.
अंतरवाली सराटी येथून निघाल्यावर जालान्यातील महाकाळ अंकुश नगर येथून मनोज जरांगेच्या कुटुंबांनी त्यांचे औक्षण केलं. दरम्यान यांच्या कुटुंबायांना अश्रूच्या धार वाहू लागल्या. मनोज जरांगेंच्या लेकीने माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ती म्हणाली की, पप्पांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांनी ठरलंय आहे, म्हणजे ते लोकशाही पद्धतीने आरक्षण मिळवतील. त्यासाठी ते आरक्षणासाठी जात आहे. माझ्या पप्पांच्या जीवाला काय झालं, तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा जरांगेच्या मुलीने सरकारला दिला आहे.