सायबर स्कॅम (Cyber Scam) म्हणजे ऑनलाइन फसवणूक किंवा घोटाळा, ज्यात सायबर गुन्हेगार आपल्या फसव्या योजनांद्वारे लोकांना फसवतात. या घोटाळ्यांमध्ये अनेकदा आर्थिक नुकसान होते किंवा वैयक्तिक माहिती चोरी होते . आता सध्या एक नवीन स्कॅम खुप मोठ्या प्रमाणावर चालू आहे तो म्हणजे व्हाट्सअप स्कॅम. WhatsApp वरील सायबर स्कॅमर्स आता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक मार्ग अवलंबत आहेत. पूर्वी जिथे फेक लिंक, OTP फ्रॉड आणि आयडेंटिटी कॉपी केली जात होती, आता एक नवा स्कॅम समोर आला आहे हा डेटा इतर सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो.
तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर जरा सांभाळुन रहा. WhatsApp वर अनोळखी नंबरवरून फोटो येत असतील ते फोटो उघडण्याचा किंवा डाऊनलोड करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण हे धोकादायक ठरू शकतं. यातून तुमचं बँक अकाऊंट देखील रिकामं होऊ शकतं..
तुम्ही WhatsApp वापरत असाल तर सावधान कारण तुमची कधीही फसवणूक होऊ शकते. एका फोटोतून तुमचे पूर्ण बँक खाते रिकामे होऊ शकते. स्कॅमर अनोळखी नंबरवरून युजर्स ना फोटो पाठवतात. एखादा युजर त्या फोटोवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या नकळत फोनमध्ये धोकादायक सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलवेअर इन्स्टॉल होतात. यानंतर फोनचे संपूर्ण नियंत्रण सायबर गुन्हेगारांकडे जाते. हे ठग WhatsApp वर नॉर्मल दिसणारा फोटो पाठवतात, पण तो फोटो धोकादायक व्हायरसने भरलेला असतो. असे फोटो डाऊनलोड करताच तुमची पर्सनल माहिती हॅकर्सच्या हाती लागते. ज्याद्वारे , गुन्हेगार तुमची गॅलरी, कॉन्टॅक्ट लिस्ट, बँकिंग ऍप्स, पासवर्ड ऍक्सेस करू शकतात. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील करू शकतात. या स्थितीत तुमच्या बँकिंग अँपमध्ये ओटीपी किंवा फिंगरप्रिंट सिक्युरिटी सेट केली असली तरीही ते तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकतात.आणि बघता बघता तुमची बँक डिटेल्स ही त्यांच्याकडे पोहोचतात आणि काही क्षणातच यूजर्स चे बँक अकाउंट खाली होते.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हा नवा स्कॅम अँड्रॉइड आणि IOS दोन्ही युजर्सना टार्गेट करत आहे. विशेषतः सण, मोठी शॉपिंग विक्री किंवा कोणतीही मोठी बातमी असताना जेव्हा लोक जास्त अॅक्टिव्ह असतात आणि अनोळखी नंबरवरून मेसेज ओपन करतात, तेव्हा असले फेक फोटो पाठवले जातात.फोटो, जोक्स, सणासुदीच्या शुभेच्छा किंवा नॉर्मल इमेज हे सगळे नॉर्मल वाटत असले तरी त्यात एक धोकादायक व्हायरस दडलेला आहे. युजरने हा फोटो डाऊनलोड करताच फोनमध्ये हा व्हायरस इन्स्टॉल केला जातो. यानंतर हॅकर्सला तुमच्या फोनचा रिमोट अॅक्सेस मिळतो .
यापासुन सतर्क राहण्यासाठी सायबर स्कॅमपासून बचाव करण्यासाठी जागरूक असणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे.त्यामुळे नेहमी जागरूक राहा आणि कोणत्याही लिंकवर किंवा फाईलवर क्लिक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.कोणताही अनोळखी फोटो, फाइल किंवा लिंक तपासल्याशिवाय उघडू नका.बँकिंग ऐप ला पासवर्ड आणि टू-फॅक्टर सिक्युरिटी वापरा.जर कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली तर ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार करायला विसरू नका.