ताज्या बातम्या

WhatsApp Web Down : लॅपटॉप-PC वर WhatsApp स्क्रोलिंग अडकतंय? माऊस आणि सिस्टममध्ये खराबी नाही तर...

जगभरातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आज सकाळपासून अनेक युजर्सना डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः WhatsApp Web सेवा वापरणाऱ्यांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Published by : Prachi Nate

जगभरातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आज सकाळपासून अनेक युजर्सना डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः WhatsApp Web सेवा वापरणाऱ्यांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

युजर्सनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp Web वर मेसेज पाठवताना अडचणी येत आहेत. काहीजणांना स्क्रोलिंगची समस्या उद्भवत आहे. म्हणजेच चॅट्स वर-खाली हलवणे किंवा जुन्या मेसेजेस पाहणे शक्य होत नाहीये. यामुळे संवाद साधण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

सुरुवातीला अनेकांना आपला लॅपटॉप, माऊस किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये बिघाड झाला असावा असं वाटलं. मात्र लवकरच हे स्पष्ट झालं की समस्या वापरकर्त्यांकडे नसून WhatsApp Web सर्व्हरकडून आहे. ट्विटरवर (आताचा X) युजर्सनी #WhatsAppDown आणि #WhatsAppWeb अशा हॅशटॅगसह तक्रारी केल्या आहेत. "WhatsApp Web मध्ये काही समस्या आहे का? मी स्क्रोल करू शकत नाही, मेसेज दिसत नाहीत" – अशा प्रतिक्रिया अनेक युजर्सकडून येत आहेत.

भारतासह जगातील काही भागांमध्ये WhatsApp Web सेवेत अडथळे आले आहेत. विशेषतः भारतातील युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडतो आहे. रविवारपासूनच ही समस्या जाणवू लागली असून सकाळी ती अधिक तीव्र झाली. या समस्येबाबत WhatsApp कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सेवेत नेमका बिघाड कुठे आहे, तो किती गंभीर आहे आणि ती कधीपर्यंत सुरळीत होईल, याबद्दलही स्पष्टता नाही. सध्या WhatsApp Web सेवा पुन्हा पूर्ववत होईपर्यंत युजर्सना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मोबाईल अ‍ॅपवर मात्र सेवा सुरळीत सुरू असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा