चाकणमधील सभेत अजित पवारांची मतदारांना भावनिक साद घालण्यात आली आहे. भावनेच्या भरात निर्णय घेतला तर पश्चातापाची वेळ येते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. तसेच अजित पवार म्हणाले काही दिवस द्या चुकलो तर कान पकडून जाब विचारा मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका असं अजित पवार म्हणाले आहेत.
चाकण मेळाव्या दरम्यान अजित पवार म्हणाले, तुमच्यामुळे मी जिल्ह्याचा पालक मंत्री आहे आणि पालक मंत्री म्हणून मी जिल्ह्याला मदत करण्याच्या हेतूने मी 5 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पण दिलीप राव म्हणाले की, दादा मदत झाली पाहिजे पण 5 कोटींची नको 10 कोटींची मदत करा. कारण आमच्याकडच्या लोकांना टाटा हॉस्पिटलमध्ये जायला तिथे जागा मिळत नाही, राहण्याची सोय नाही, म्हणून तुम्ही 10 कोटींची मदत करा आणि म्हणून मी तिथे त्यांना 10 कोटींची मदत करणार आहे.
आपले कार्य सम्राट आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहाव. ते सांगतील त्याप्रमाणे आपण त्याठिकाणी भूमिका घ्यावी आणि भावनेच्या भरात घेतलेला निर्णयामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते त्याच्यामुळे पश्चातापाची वेळ येईल असा निर्णय चाकणमधील जनतेनी आजपर्यंत घेतला नाही यापुढे ही घेणार नाही याबद्दलची खात्री मला आहे. तसचं तुम्हाला मी कधी एकटं वाटू देणार नाही, तशी वेळ तुमच्यावर कधी येणार नाही.