भारताची नॅशनल क्रश आणि वर्ल्ड कप विजेती रणरागिणी स्मृती मानधना आता लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्मृतीने बॉयफ्रेंड पलाश मुच्छलबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृतीच्या एंगेजमेंट रिंगचा व्हिडिओ जोरदार व्हायरल व्हायला लागला आणि तिचं लग्न कधी व कुठे आहे, यासाठी चाहते सर्च करायला लागले. पण त्यानंतर काही वेळातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट व्हायरल झाली, त्यामुळे आता स्मृती आणि पलाश यांचे लग्न नेमके कधी होणार आहे, याची माहिती समोर आली आहे.
स्मृतीच्या लग्नाची बातमी कशी समोर आली...
स्मृती आणि पलाश हे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण या दोघांनी याबाबत तोपर्यंत कधीही माहिती दिली नव्हती. पलाश इंदूर येथे एका पत्रकार परिषदेत आला होता. त्यावेळी पलाशला स्मृतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पलाश म्हणाला होता की, " स्मृती ही इंदूरचीच सून होणार आहे. मी तुम्हाला एवढी मोठी बातमी दिली आहे, याचा विचार करा. " त्यानंतर सर्वांना समजलं की, पलाश हा इंदूरचाच आहे आणि स्मृती ही पलाशची लग्न करणार आहे.
स्मृती आणि पलाश यांचं लग्न कुठे होणार आहे...
स्मृती आणि पलाश लग्न होणार तरी कुठे, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण स्मृतीने लग्न महाराष्ट्रातच करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्मृती आणि पलाश याचंं लग्न हे स्मृतीच्या शहरात म्हणजेच सांगली येथे होणार असल्याची माहिती समोर आली होती. स्मृतीचं लग्न कधी होणार, याची तारीखही समोर आली होती. स्मृतीचे लग्न २० नोव्हेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे शुक्रवारी स्मृती आणि पलाश यांचे सर्व चाहते सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहत होते. पण रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती आणि पलाश यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पत्रक काढले आणि यामध्ये लग्नाची तारीख लिहिण्यात आली होती. या पत्रकानुसार स्मृती आमि पलाश यांचे लग्न हे २३ नोव्हेंबरला होणार असल्याचे समोर आले आहे. स्मृती आणि पलाश यांनी ही माहिती गोपनिय ठेवली होती. पण नरेंद्र मोदी यांच्या पत्रकामुळे हे सिक्रेट आता सर्वांसमोर आलं आहे.