थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महाबळेश्वर येथे होत असलेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स यांच्या 15 व्या वार्षिक संमेलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली.असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ सातारा यांच्यावतीने आयोजित केलेल्या या संमेलनात वैद्यकीय क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.या संमेलनास राज्यभरातून आलेल्या हजारो डॉक्टर बांधवांनी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री यांनी जोरदार फटकेबाजी साताऱ्याची माणस कंदीपेढ्यासारखी गोड असतात त्यांच्या ह्रदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी असते त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो कारण माझा मुलगाही एक डॉक्टर आहे त्या मुळे एका डॉक्टरचा पिता म्हणून येण्याच भाग्य मला लाभल आहे.मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन करतो.जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते ऑपरेशन मी केल आहे.अस सांगत स्ट्रेस घालवण्यासाठी माणस साताऱ्यातील महाबळेश्वरला येतात येथील मातीचा गुणधर्म आहे.इकडे आल की स्ट्रेस कमी होतो मला ही स्ट्रेस आला की मी गावाकडे येतो.आणी मी इकडे आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो.
Summery
'जे महाराष्ट्राला अपेक्षित, ते ऑपरेशन मी केलंय'
'मी गावी आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो'
उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यात फटकेबाजी