वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र दुःख व्यक्त करत आहे. पुणे पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. त्यानंतर वैष्णवीची मोठी जाऊ मयूरी जगताप हिने लोकशाही मराठीसोबत बातचीत केला, यामध्ये दिला केलेली मारहाण असे सगळे सांगितले आहे.
मयूरी जगताप म्हणाली की, "वैष्णवीबद्दल मला समजलं त्यावेळेस मला धक्का बसला. आता तिच्या बाळाच कसं होणार असा प्रश्न माझा मनात आला होता. याआधी हगवणे कुटुंबाने मला खूप त्रास दिला. परंतू माझे पती माझ्यासोबत होते, म्हणून मी त्रास सहन करु शकले. माझी आई-भाऊ समवायला यायचे त्यांना त्यावेळेस दीराचं म्हणणं अस होत की, तुमचा जावई शेजारच्या खोलीत राहतो. हे दार तुमच्यासाठी बंद आहे. दीराने आणि नंणदने माझ्या आईला घराच्या बाहेर काढले."
शशांकच लग्न वैष्णवीसोबत झाले त्यावेळेस जीवाची घालमेल झाली,
"शशांकच लग्न वैष्णवीसोबत ठरले त्यावेळेस मला वाटले की वैष्णवीला जाऊन सांगावे, परंतू ती शशांकच्या प्रेमात वेडी झाली होती. मी जर सांगितल असतं तर, हगवणे कुटुंबानी मला जास्त त्रास दिला असता."
नेमका कसा त्रास दिला?
"मला वडील नसल्याचे त्यांनी माझा फायदा घेतला. त्यांना माहिती होत की पोलिस आणि राजकीय दबाबमुळे सर्व प्रकरण दाबू शकतो. 20 मे 2022 रोजी माझ लग्न झाले."
हुंडा किती दिला होता?
"माझ्या आईने 15 तोळे सोनं आणि 10 लाख हुंडा दिला होता. तरी सुद्धा नणंद आणि दीर सारखे टॉर्चर करत होते. तू आम्ही जसं बोलू तसंच वागल पाहिजे."
नणंदेचे सर्व ऐकायचे
"दोन्ही भावामध्ये नणंद ही 5 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे सासू सारखी बोलायची की, पिंकीताईचे सर्वांनी ऐकायचे. ती बोलेल तसंच वागायचं. त्याची मुलगी बोलेल तसं वागणारी पाहिजे होती, प्रतित्तुर दिले की मारहाण करणारी केली जात होती. परंतू वैष्णवी पिकींताईच ऐकणारी होती, तरी सुद्धा तिला मारहाण का केली माहिती नाही."
घराबाहेर पडले त्यावेळेस सुद्धा धाक होता
"1.5 वर्षांपुर्वी मी माझा संसार शेजारच्या खोलीत मांडला होता. त्यावेळेस माझ्या पतीची मला साथ होती. सासू- सासरे, दीर, नणंद आम्हाला कुठे प्लॅट मिळून देत नव्हते. मानसिक छळ करत होते, मलाच नाहीतर, स्वतःच्या मुलाला ते टॉर्चर करत होते. का तर माझे आणि माझ्या पतीचे नाते खराब व्हावे म्हणून, ते प्रयत्न करत होते. लोकांना सागंत होते की, तिला सोड्याला लावा आम्ही त्याचे दुसर लग्न लावू. सुंदर आणि श्रीमंत घराची मुलगी आणू त्याच्यासाठी. परंतू माझ्या पतीने माझी साथ सोडली नाही."
माझ्यासुद्धा चारित्र्यावर संशय घेतला
"माझी सासू, नणंद आणि दीर माझ्या नवऱ्याला भडकवत होते. ती कुठे जाते बघ? तिच्या मागे जात जा. आमच्यामध्ये भांडण लावून देत होते."