ताज्या बातम्या

Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी?

Published by : Team Lokshahi

मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडचे 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार होते. मात्र पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्याने हे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. आता कोस्टल रोडच्या उद्घाटनाची नवीन तारीख समोर येतेय. कोस्टल रोडचे उद्घाटन फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे.

वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यापैकी एका तारखेला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे 85% पेक्षा अधिक काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह पर्यंत 4 लेन सुरू करण्यात येणार आहेत. तर, मे 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...