ताज्या बातम्या

Election Commission : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीची मतदारसंघ राज्यातील निश्चित झाल्यानंतर मतदारसंघावर आरक्षण कधी पडणार सर्व इच्छुकांचे लक्ष याकडे लागून राहिले होते.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

  • अंतिम आरक्षणाची तारीख राज्य निवडणूक आयोगाने निश्चित

  • प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीची मतदारसंघ राज्यातील निश्चित झाल्यानंतर मतदारसंघावर आरक्षण कधी पडणार सर्व इच्छुकांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. आता अंतिम आरक्षणाची तारीख राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. अंतिम आरक्षण नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्धी करावे, राज्यातील 32 जिल्हा परिषदांना असे परिपत्रकच देण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेला त्यामुळे आणखी गती येणार आहे.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. 8 ऑक्टोबरला नगरपरिषद, नगरपंचायतींची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या तसेच थेट अध्यक्षपदाच्या 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यावर हरकती तसेच सूचना दाखल करता येतील.1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. प्राभगनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार

Flight Service From India to China : भारतातून चीनला जाण्यासाठी आता मिळणार थेट विमान सेवा

Sanjay Raut : स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचं असं कोणतं राष्ट्रकार्य होत ? राऊतांचा सवाल