आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन मेळावा संपन्न होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले आहे. या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी म्हणाले की, "आम्हाला सांगता हिंदुत्व सोडलं तर, भाजपवाल्यांना मी विचारतो, तुम्ही काय सोडलं? कारण मधेच तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता. तसेच सिंदूर वाटता. पण ते वाटणार कोणतर, तो नालायक मंत्री विजय शहा, ज्याला भर रस्त्यामध्ये चापकाने फोडलं पाहिजे. अशा व्यक्तींवर भाजप अजूनकाही कारवाई का करत नाही. सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी असून त्या लष्करांमध्ये मोठ्या पदावर आहेत. अशा भागिनीला हा विजय शहा पाकिस्तनाची बहीण म्हणतो, ही अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे. अशा भाजपकडून आपण देश सुधारण्याची आशा करत आहोत. इतरवेळी शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेत नाहीतर, आता पाकिस्तान आपण घेतला असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर 'वॉर रुकवादी पापा'" उद्धव ठाकरेंची ट्र्म्प यांच्यावर टीका केली आहे.
पुढे ठाकरे बोलतात की, "ट्रम्पचा फोन आल्यावर भाजपचा आवाज बंद झाला. काय करायचे असे प्रधानमंत्री, गृहमंत्री?. राऊतांनी विचारलेला प्रश्नबरोबर आहे. पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी कुठे गेले पातळात की भाजपात? आता फक्त दाऊदला घ्यायचे बाकी आहे, बाकी सर्वांना घेतले आहे.