Where does the government get money for the budget and through which methods does it earn 
ताज्या बातम्या

Budget 2026 : सरकारचा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो? जाणून घ्या...

अर्थसंकल्प 2026 आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कर कमी होणार की वाढणार, नवीन योजना येणार की जुन्यांनाच चालना मिळणार, शिक्षण-आरोग्यासाठी किती तरतूद होणार हे प्रश्न दरवर्षी चर्चेत असतात.

Published by : Riddhi Vanne

अर्थसंकल्प 2026 आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कर कमी होणार की वाढणार, नवीन योजना येणार की जुन्यांनाच चालना मिळणार, शिक्षण-आरोग्यासाठी किती तरतूद होणार हे प्रश्न दरवर्षी चर्चेत असतात. पण एक प्रश्न नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात असतो, सरकारकडे एवढा पैसा येतो तरी कुठून?

सरकार कमाई कशी करते?

सरकारचा पैसा फक्त करातूनच येतो असं नाही. प्रत्यक्षात मोठा वाटा कर्जातून उभा केला जातो. बाजारातून कर्ज घेऊन सरकार आपला खर्च भागवते. यानंतर आयकर, जीएसटी आणि कंपन्यांकडून घेतला जाणारा कर हे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्याशिवाय सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, सरकारी कंपन्यांचा नफा, दंड-फी अशा मार्गांनीही पैसे जमा होतात.

कर का महत्त्वाचा?

कर म्हणजे सरकारच्या तिजोरीचा कणा. पगारावरचा आयकर, कंपन्यांचा कर हे थेट कर झाले, तर वस्तू-सेवांवरचा जीएसटी हा अप्रत्यक्ष कर. आपण खरेदी करत असलेल्या अनेक वस्तूंमधून हा पैसा हळूच सरकारपर्यंत पोहोचतो.

खर्च कुठे होतो?

सरकारचा सर्वात मोठा खर्च राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीवर होतो. त्यानंतर जुन्या कर्जावरील व्याजफेड, विविध सरकारी योजना, संरक्षण खर्च, अनुदान, पेन्शन अशा बाबींवर पैसा खर्च केला जातो.

थोडक्यात काय तर, सरकारचा एक रुपया अनेक मार्गांनी जमा होतो आणि तो देश चालवण्यासाठी, योजना राबवण्यासाठी आणि जबाबदाऱ्या निभावण्यासाठी वापरला जातो. बजेट म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर त्या आकड्यांमागची देशाची दिशा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा