थोडक्यात
दहशतवादी डॉक्टरांना आर्थिक पुरवठ्याचा तपास सुरू
दहशतवादी डॉक्टरांच्या खात्यात संशयास्पद व्यवहार;
शाहिनाच्या बॅंकेत तब्बल रक्कम जमा
10 नोव्हेंबरच्या सायंकाळी नित्याप्रमाणे दिल्लीचा लाल किल्ला परिसरात सर्वकाही ठीक सुरू होते आणि अचानक एक मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुरूवातीला हा कार स्फोट असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर एका मागून एक धक्कादायक अशी खुलासे होताना दिसली. या हल्ल्याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता.
हैराण करणारे म्हणजे काही डॉक्टरांनी मिळून कट रचला. उमर हा देखील डॉक्टर होता जो i-20 गाडी चालवत होता आणि स्फोट ज्यावेळी करण्यात आला, त्यावेळी उमर देखील गाडीतच होता. तपास यंत्रणांच्या हाती या स्फोटासंदर्भातील महत्वाची धागेदोरे लागली आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. ज्यामध्ये तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली.
डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांचा समावेश आहे. हैराण करणारे म्हणजे दोघेही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संलग्न आहेत. आता जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी निधीची चौकशी करत आहेत. त्यामध्ये धक्कादायक माहिती पुढे येतंय. डॉ. शाहीन सईद ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या संपर्कात होती. शाहीन हिच्याकडे मोठी जबाबदारी होती. डॉ. शाहीन सईदला जैश या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळत होता. शाहिना ही जैश-ए-मोहम्मदच्या इशाऱ्यावर काम करत होती.
उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला शाखेसाठी भरती केंद्रे स्थापन करण्याची मोठी जबाबदारी शाहिना हिच्यावर होती. हैराण करणारे म्हणजे ती सहारनपूर आणि हापूर शहरांच्या बाहेरील भागात मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी जागा शोधत होती. शाहीनच्या खात्यात परदेशी निधी आल्याचे काही व्यवहारांहून स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाबाबत शाहीनची सतत चौकशी केली जात आहे. शिवाय, मौलवी इरफान अहमद हा जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होता आणि त्याला जैशकडून निधीही मिळत होता. भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत हे होते. शाहिनाचा महाराष्ट्रातील मुलासोबत लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि तिने महाराष्ट्र सोडला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.