Chief Minister Devendra Fadnavis' big statement regarding the upcoming elections : Chief Minister Devendra Fadnavis' big statement regarding the upcoming elections :
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis Big Statment : "जिथे फायद्याचे असेल..." आगामी निवडणुकाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई वगळता इतर ठिकाणी युतीची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात महायुतीचा निवडणूक फॉर्म्युला स्पष्ट केला.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • मुंबई वगळता इतर ठिकाणी युतीची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात महायुतीचा निवडणूक फॉर्म्युला स्पष्ट केला.

Chief Minister Devendra Fadnavis' big statement regarding the upcoming elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी युतीची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात महायुतीचा निवडणूक फॉर्म्युला स्पष्ट केला.

फडणवीस म्हणाले, “जिथे महायुतीला फायदा होईल तिथे आम्ही एकत्र लढू, आणि काही ठिकाणी स्वतंत्रपणेही मैदानात उतरणार आहोत.” मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. फडणवीसांनी स्पष्ट केले की, मुंबईतील राजकीय गणित वेगळे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर असून, अजित पवारांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा ठिकाणी एकत्र लढल्यास तिकीट न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या गटाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात मात्र भाजपचे प्राबल्य स्पष्ट आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. मागील निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे फक्त दोन. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेत युती होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. दरम्यान, काँग्रेसनेही आपल्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्र आघाड्या करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक निवडणुका अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा