bjp ministers 
ताज्या बातम्या

भाजपच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पाहुया.

Published by : Team Lokshahi

नागपुरात नव्या मंत्रिमंडळात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भाजपच्या ३ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांची यादी-

  • चंद्रशेखर बावनकुळे

    महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.

  • राधाकृष्ण विखे पाटील

    ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. विखे पाटील हे २०१४ ते २०१९ का काळात राज्याचे माजी विरोधीपक्षनेते होते. महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. ६ वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. शिवाय महायुतीच्या काळात त्यांनी दोन वेगवेगेळ्या खात्यांचा कारभार बघितला.

  • गिरीश महाजन

    भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनी चौथ्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. जळगावच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून ते विधान परिषदेमध्ये दाखल झाले आहेत. १९९५ ला ते पहिल्यांदा आमदार झाले. आता सातव्यांदा ते विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून दाखल झाले आहेत. महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, ग्रामविकास या खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली.

  • गणेश नाईक

    भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री होत आहेत. गणेश नाईक हे भाजपचे नवी मुंबईतील ताकदवान नेते आहेत. ते 2004 पासून आमदार म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. गेणेश नाईक यांचं नवी मुंबईत असलेलं राजकीय वर्चस्व पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे. गणेश नाईक यांचा आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांचा 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला होता.

  • शिवेंद्र राजे भोसले

    शिवेंद्रराजे भोसले हे 2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली आहे.

  • आकाश फुंडकर

    आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आकाश फुंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. ते खामगांव मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप पक्षाने आकाश फुंडकर यांनी केलेल्या विकासकामांचं रिपोर्ट कार्ड पाहून मंत्रिपदाची संधी दिली आहे.

  • नितेश राणे

    भाजप आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते गेल्या तीन विधानसभा निवडणुकींमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. नितेश राणे हे भाजपचे आक्रमक तरुण नेते आहेत. नितेश राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. तसेच नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे देखील या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर कुडाळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन आमदार आणि एक खासदार असं चित्र आहे. नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय टोकाची टीका केली. त्यांनी विरोधकांवर अतिशय आक्रमकपणे निशाणा साधला. ते राज्यभरात फिरले. त्यांच्या विविध सामाजिक कामे, मतदारसंघातील कामे आणि विरोधकांवर तुटून पडण्याची भाषाशैली यामुळे पक्षाने खूश होत त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.

  • माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)

    माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मिसाळ या 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे.

  • मेघना बोर्डीकर (राज्यमंत्री)

    मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत. बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत. बोर्डीकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आमदारकी जिंकली. यावेळी त्यांची दुसरी टर्म आहे. त्यांच्या कार्यावर खूश होत पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.

  • पंकज भोयर (राज्यमंत्री)

    पंकज भोयर हे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते वर्धा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर पक्षाने आता मंत्रिपदाची मोठी संधी दिली आहे.

  • चंद्रकांत पाटील

    भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्यातल्या कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महायुती सरकारच्या काळात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला.

    भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली

    महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष २०१४ मध्ये सहकार पणन मंत्री, कृषी खात्यााच पदभार सांभाळला

    फलोत्पादन आणि महसूल मंत्री म्हणून जबाबदारी

    २००८ पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार

    २००९ मध्ये सावंतवाडीतून पहिल्यांदा आमदार

    २०१४ पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार

    २०१९, २०२४ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार

  • आशिष शेलार

    आशिष शेलार यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष असणाऱ्या शेलार यांनी ABVPतून राजकारणाला सुरुवात केली. अॅडव्हॉकेट असलेले शेलार हे भाजपचा तरुण आणि उच्चशिक्षित चेहरा आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिमचे आमदार आहेत.

  • जयकुमार गोरे

    जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जयकुमार गोरे हे साताऱ्यातील माण-खटावचे आमदार आहेत. माण-खटावला यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहेत.

  • मंगलप्रभात लोढा

    मंगलप्रभात लोढ यांनी संस्कृतमधून मंत्रीपदाची शपथ घेतली. ते भारतातील नववी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुंबईतील मलबार हिलचे ते आमदार आहेत. 2014 पासून मंत्रि‍पदावर आहेत.

  • जयकुमार रावल

    जयकुमार रावल यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच 2009 पासून चौथ्यांदा विधानसभेवर आहेत.

  • पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. भाजपचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. 2024 च्या लोकसभेत पराभूत झाल्या असून लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेत विजयी झाल्या आहेत.

  • अतुल सावे

    अतुल सावे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अतुल सावे हे मराठवाड्यातील ओबीसी चेहरा आहेत. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत.

  • अशोक उइके

    अशोक उइके यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. 2014 पासून ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 2019 मध्ये आदिवासी विकासमंत्री आणि यवतमाळच्या राळेगावचे आमदार आहेत.

  • संजय सावकारे

    संजय सावकारे यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बाजी मारत ते पहिल्यांदा आमदार झाले. 2014 साली संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदार संघात भाजपाचे संजय सावकारे हेच विजयी झाले होते. २०१४ पासून सलग ४ वेळा आमदार राहिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य