ताज्या बातम्या

Lucknow Airport Incident : लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; हज यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या विमानाच्या चाकातून ठिणग्या आणि धूर

रविवारी सकाळी लखनऊ विमानतळावर हज यात्रेकरूंना घेऊन आलेल्या सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या विमानासोबत भीषण अपघाताची शक्यता टळली.

Published by : Prachi Nate

रविवारी सकाळी लखनऊ विमानतळावर हज यात्रेकरूंना घेऊन आलेल्या सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या विमानासोबत भीषण अपघाताची शक्यता टळली. जेद्दाहून आलेले SV 3112 हे विमान उतरत असताना त्याच्या चाकातून अचानक धूर आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या. या प्रसंगी विमानात सुमारे 250 प्रवासी होते. काही क्षण भीतीदायक ठरले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप असल्याची अधिकृत माहिती आहे.

घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. लँडिंगदरम्यान धावपट्टीवर विमानाच्या एका चाकातून ठिणग्या उडताना आणि धूर येताना दिसला. हे दृश्य पाहून तात्काळ विमानतळ प्रशासन सतर्क झाले. आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विमानाला टॅक्सीवेवर सुरक्षितरित्या हलवण्यात आले. संपूर्ण विमान रिकामे करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अनेक प्रवासी घाबरून गेले होते, परंतु वैद्यकीय तपासणीनंतर कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत 270 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही ताजी असतानाच, लखनऊमध्येही अशाच स्वरूपाचा अपघात टळल्याने हवाई प्रवासासंबंधी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. DGCAने या घटनेचा तपास सुरू केला असून विमानाच्या चाकात नेमकी समस्या काय होती, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द