अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्मश्री अभिनेते अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचे लोकार्पण पडलं पार पडले. यावेळी अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अलका कुबल, उषा नाडकर्णी, संतोष जुवेकरसह अनेक सिनेस्टार उपस्थित होते. या आधी नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर विठ्ठलवाडी या भागातील नागरिकांना कल्याण डोंबिवली किंवा ठाण्याला जावं लागत होतं. आता मात्र अंबरनाथ शहरात हे नाट्यगृह उभ राहिल्याने रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या ठिकाणी होणार आहेत,
पश्चिमेच्या सर्कस ग्राउंड परिसरात हे नाट्यगृह उभारण्यात आले असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ शहरात नाट्यगृहाच्या माध्यमातून ही भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. याचपार्श्वभूमिवर काल या कार्यक्रमाला उपस्थित असताना पद्मश्री अशोक सराफ यांनी अनुस्वारावर भाष्य करत असताना एक असा विनोद मारला ज्यामुळे संपुर्ण नाट्यगृहात असणारे लोक खळखळून हसायला लागले.
"या कार्यक्रमात मगाशी बरीच भाषणं झाली. ज्यात आपले अनासपुरे म्हणाले, अनुस्वाराला महत्त्व आहे. विकाराबाधित सत्य आहे हे... अनुस्वार हा एखाद्या गंधासारखा आहे. तो नीट दिला गेला तरच त्या वास्तूला महत्त्व दिलं जात. ते म्हणाले रग म्हणतो आपण रग... पण त्याला अनुस्वार दिला तर त्याचा रंग होतो. फार छान गोष्ट आहे ही.... पण मी घाबरलो... मला वाटल आता तो म्हणतो की काय, गाडी नावाचा पण एक शब्द आहे... मी त्याला धन्यवाद देतो, तो शब्द न बोल्याबद्दल. आपण एका ठिकाणी बोलतो की, आपण सुसंकृत वगरे बोलतो आणि असं काही तरी बोलायचं. पण हा विनोद होता बाकी काही नाही..." अशोक सराफ यांनी केलेल्या या विनोदाने नाट्यगृहात हास्याचे वातावरण निर्माण झाले होते.
दिवाळीत अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या माध्यमातून एक मोठ गिफ्ट खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवाय या नाट्यगृहाचे लोकार्पण होत असताना "सही रे सही" या नाटकाचा प्रयोग या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सलग पाच दिवस व्यावसायिक रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग इथे होणार आहेत.