Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिवसेना-भाजपा युती कोणामुळे तुटली? 'लोक माझी सांगाती'मध्ये शरद पवारांनी केला खुलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? याचा खुलासा लोक माझी सांगाती या आत्मचरित्रातून करण्यात आला आहे.

फडणवीस यांचं खरं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसच होती,स्वपक्षाची ताकद फडणवीस वाढवताहेत, हे शिवसेनेला थोडं उशिरा उमगलं. पक्ष वाढविण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचीही शरद पवार यांनी कौतूक केलं आहे. शिवसेनेशी असलेलं नातं एकीकडे टिकवत असताना दुसरीकडे भाजपचा विस्तार करायचा, पक्षाची ताकद वाढवायची. असे पवारांनी म्हटले आहे.

शिवसेना भाजपा युती टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न केले. सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते दिसत होते. शिवसेनेशी असलेलं नातं एकीकडे टिकवत असताना दुसरीकडे भाजपचा विस्तार करायचा. हे फडणवीसांचे उद्दिष्ट होते. असे शरद पवार म्हणाले. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची युती तोडली, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. मात्र यावर लोक माझी सांगाती या आत्मचरित्रात लिहिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा