ताज्या बातम्या

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज मागे कोण? फडणवीसांबाबत मोठी माहिती

Published by : shweta walge

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याची माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना