नागपूर हिंसाचार प्रकरणात महाल परिसरातून काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंसाचार झाला त्या दिवशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या घरासमोर मोठा जमाव होता. त्यामुळे पोलिसांकडून एका आरोपींला ताब्यात घेऊन त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजच्या DVR जप्त देखील केला आहे. नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे आलं.
कोण आहे फईम शईम खान ?
वयोवर्ष 38 फईम शईम खान याची शैक्षणिक पात्रता 10 पास आहे. हा मायनॅारीटी डेमोक्रेटीक पार्टीचा नागपूर अध्यक्ष असून त्याने 2024 ची लोकसभा निवडणुक मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीकडून उमेदवारी लढविली होती ज्यात त्याला पराभव पत्कारावा लागला. तसेच त्याची 75000 संपत्ती असून त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.
नागपुरमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी फहीम खानने प्रवृत्त केल्याची माहिती समोर येत आहे. "पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता", अशी माहिती समोर आली आहे. नागपूरात सोमवारी रात्री झालेल्या दंगल प्रकरणी आतापर्यंत सहा FIR रजिस्टर झाले आहेत