ताज्या बातम्या

Tahawwur Rana: पाकिस्तान आर्मीचा माजी अधिकारी ते 26/11 हल्ल्याचा सूत्रधार

त्याची आता चौकशीदेखील केली जाणार आहे. पण हा तहव्वुर राणा नक्की आहे तरी कोण?

Published by : Shamal Sawant

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला गेला. या प्रकरणातील पकडला गेलेला आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण आता याच हल्ल्याचा मास्टरमाइंड आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले गेले आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचे आत्मसमर्पण वॉरंट बजावण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला NIA च्या ताब्यात दिले गेले आहे. त्याची आता चौकशीदेखील केली जाणार आहे. पण हा तहव्वुर राणा नक्की आहे तरी कोण?

कोण आहे तहव्वुर राणा ?

तहव्वुर राणा हा मूळ पाकिस्तानी वंशाचा आहे. नंतर तो पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सामील झाला. मात्र 1997 मध्ये त्याने नोकरी सोडली आणि तो कॅनडाला गेला. त्या ठिकाणी इमिग्रेशन कन्सल्टन्सी आणि इतर व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे. त्याचदरम्यान त्याची ओळख 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामधील अजून एक सूत्रधार डेव्हिड हेडलीशी झाली.

NIA च्या अहवालानुसार, डेव्हिड हेडली आणि तहव्वुर राणा यांनी भारतातील दिल्ली, मुंबई, जयपूर, पुष्कर, पुणे आणि गोवा आशा अनेक राज्यांना भेट दिली. दोघंही इमिग्रँट लॉ या कंपनीच्या नावाखाली फिरत असत. हे कार्यालय मुंबईच्या ताडदेव रोडवर होते, दरम्यान हे कार्यालय सुरु करण्यासाठी राणाने हेडलीला मदत केल्याचेदेखील अहवालातून समोर आले आहे.

त्याचप्रमाणे आरोपपत्रात असे नमूद केले आहे की भारतातील ठिकाणी हल्ला करण्याचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता. हेडली आणि राणा वगळता नऊपैकी सात आरोपी पाकिस्तानमध्ये आहेत. आरोपपत्रात म्हटले आहे की राणाने भारतात दहशतवादी हल्ले आयोजित करण्याच्या गुन्हेगारी कट रचण्यासाठी डेव्हिड हेडली आणि इतर सह-षड्यंत्रकर्त्यांना लॉजिस्टिक, आर्थिक आणि इतर मदत केली.

तहव्वुर राणावर कोणते आरोप ?

राणाने हेडलीला अनेक प्रकारे मदत केली, ज्यामध्ये त्यांच्या कारवाया लपवण्यासाठी मुंबईत इमिग्रंट लॉ सेंटरची स्थापना करणे आणि 26/11 हल्ल्यामागील गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून नोव्हेंबर 2008 मध्ये भारताचा दौरा करणे यांचा समावेश आहे. त्याच्यावर गुन्हेगारी कट, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, खून आणि बनावटगिरी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत संबंधित कलमांखाली आरोप आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद