सदनिका घोटाळाप्रकरणात राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांची अडचणी वाढल्या आहे. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोव वर्षांच्या कारवसाची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आज माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातत अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मंगळवारी झालेल्या सुनावाणीच्या वेळी नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे माणिकराव कोकाटेंचं (Manikrao Kokate) खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुणाला द्यायचं असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. कोकाटे यांना त्यामुळे आता अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सदनिका घोटाळाप्रकरणात दोन वर्षांची शिक्षा कायम असल्याने आज क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार आहे. तसेच आता कोकाटे नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्यणाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे. माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात अटक वॉरंटला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी नाशिक शहरातील एक उच्चभ्रू परिसरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वत: सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन यांना कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हयू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदानिका प्राप्त केल्या होत्या. मात्र या प्रकरणात दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केल्याने जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकीशी केली होती. यानंतर या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारवास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली होती.
या निर्णयाविरोधात प्रथम वर्ग न्यायालयाच्या माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती मात्र जिल्हान्यायालयाने देखील राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत दोन वर्ष शिक्षेचा निर्णय कायम ठेवल्याने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाल्याने माणिकाराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांना कृषि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.