ताज्या बातम्या

Chief Justice Bhushan Gavai : कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश? सरन्यायाधीश भूषण गवईंकडून नावाची शिफारस

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नावाची शिफारस यामध्ये त्यांनी केली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • सरन्यायाधीश भूषण गवईंकडून उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस

  • स्टीस सूर्यकांत त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

  • कोण आहेत जस्टीस सुर्यकांत?

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नावाची शिफारस यामध्ये त्यांनी केली आहे. कारण मुख्य न्यायाधीश भूषण गवई लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. या अगोदर त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे. 23 नोव्हेंबरला मुख्य न्यायाधीश म्हणून गवई यांचा कार्यकाल समाप्त होईल. त्यामुळे त्यांच्यानंतर जस्टीस सूर्यकांत हे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील अशी शक्यता आहे.

मुख्य न्यायाधीशांच्या पदाबाबत अशी परंपरा आहे की, सध्या पदावर असलेल्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या एक महिना अगोदर कायदे मंत्रालयाकडे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची नावाची शिफारस करायची असते. त्यातच देशाचे पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? हे स्पष्ट होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सेवा जेष्ठतेच्या नियमांनुसार जस्टीस सूर्यकांत हे आहेत. जे देशाचे 53 वे मुख्य न्यायाधीश होतील. ते 24 नोव्हेंबरला देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील त्यानंतर ते 9 फेब्रुवारी 2027 ला सेवानिवृत्त होतील.

कोण आहेत जस्टीस सुर्यकांत?

10 फ्रेब्रुवारी 1962 ला जस्टीस सुर्यकांत यांचा जन्म हरियाणाच्या हिसारमध्ये झाला होता. ते सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यानंतर सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीस आहेत. त्यांनी 1981 मध्ये गव्हर्मेंन्ट पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, हिसार ग्रॅज्युएशन केलं त्यांनतर 1984 मध्ये त्यांनी रोहतकला महर्षि दयानंद युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच वर्षी त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. त्यानंतर एका वर्षांने ते पंजाब आणि हरियाणामध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी गेले. 2004 ला त्यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनाहिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून 5 ऑक्टोबर 2018 ला नियुक्त करण्यात आलं होतं. त्या नंतर एका वर्षाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 24 मे 2019 ला नियुक्त करण्यात आलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा