ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांचे कुटुंबिय विलेपार्ले स्मशानभूमीवर पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर आधी रुग्णालयात आणि नंतर घरी असे उपचार सुरुच होते पण अखेर आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नक्की सर्वांनाच धक्का बसला असून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे शेवटे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार देखील स्मशानभूमीत पोहोचत आहेत.
धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले
दरम्यान धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तब्बल एका वर्षात 70 पेक्षाही जास्त हीट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही.धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे, विशेषतः त्यांच्या दोन लग्नांबद्दल. धर्मेंद्र हे चित्रपटांप्रमाणेच ते राजकारणातही सक्रिय होते. ते माजी खासदार होते. त्यामुळे आता मोठा प्रश्न असा आहे की खासदारकीची पेन्शन नक्की कोणाला मिळणार. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर की त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी?
कायदा काय सांगतो?
भारतातील खासदारांच्या पेन्शनचे नियम स्पष्ट आहेत. खासदाराच्या मृत्यूनंतर, पेन्शन त्यांच्या कायदेशीररित्या वैध पत्नीला दिली जाते. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौरशी झाले होते. नंतर त्यांनी हेमा मालिनीशी लग्न केले, ज्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असे म्हटले जाते. हिंदू विवाह कायद्यानुसार, जर पहिली पत्नी जिवंत असेल आणि घटस्फोट झालेला नसेल तर दुसरे लग्न अवैध मानले जाते. त्यासाठी त्यांनी केवळ दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.
पेन्शनचा अधिकार कोणाला असतो?
पण कायद्यानुसार फक्त पहिली पत्नी पेन्शनसाठी पात्र असते. जर लग्न कायदेशीररित्या वैध असेल तरच दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र असते. सीसीएस म्हणजे पेन्शन नियम, 2021 मध्ये असेही म्हटले आहे की जर दोन्ही लग्न वैध असतील तर पेन्शन समान प्रमाणात विभागली जाईल. तथापि, धर्मेंद्र यांच्याबाबतीत, त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर याच कायदेशीररित्या वैध जोडीदार आहे.
कोणत्या पत्नीला मिळणार पेन्शन?
धर्मेंद्र यांचे दोन्ही विवाह सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेले होते, परंतु कायदेशीररित्या, फक्त त्यांची पहिली पत्नीच वैध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांची खासदारकीची पेन्शन प्रकाश कौर यांनाच मिळणार असल्याची माहिती आहे. या परिस्थितीत हेमा मालिनी पेन्शनसाठी पात्र राहणार नाहीत.