या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर यावेळी येथे त्यांनी रुपाली ठोंबरे उपस्थित होत्या.
पुण्यामधील गुन्हेगारी कमी करण्याची जबाबदारी कोणाची ? यावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, सर्वच राजकारणाची जबाबदारी आहे गुन्हेगारी कमी करणे ही कोण्या एकट्याची जबाबदारी नाही, पुण्यात पहायला गेलं तर लोकसंख्या खूप आहे. पुणे आडवं वाढतं आहे. आणि बरेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत गुन्हेगारांवर आळा बसणे गरजेचे आहे. पाहायला गेलं तर गुन्हेगारांच्या सोबत कुटुंबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. महिलांनी स्वतः लक्ष घातलं तर आपल्या कुटुंबावर तर गुन्हेगारी कमी होईल पण संपणार नाही.