Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा
ताज्या बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा

गणपतीच्या 'एकदंत' नावामागील पुराणकथा: परशुरामासोबतच्या युद्धाची रोचक आख्यायिका

Published by : Team Lokshahi

संपूर्ण देशभरात सध्या गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. घरोघरी, मंडपात, गल्लीबोळात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. या उत्सवात गणेशाच्या विविध रूपांची, नावांची आणि स्वरूपांची भक्त मनोभावे पूजा करीत आहेत. गणपतीचे एकूण 108 नावे प्रचलित आहेत. त्यातील एक विशेष नाव म्हणजे ‘एकदंत’. म्हणजेच एकच दात असलेला. पण गणपतीला हे नाव का दिले गेले? बाप्पाचा एक दात कसा तुटला? या मागे अनेक पुराणकथा जोडलेल्या आहेत.

परशुरामासोबतच्या युद्धाची कथा

‘गणेश पुराणात’ गणपतीला ‘एकदंत’ का म्हटले जाते, याची एक प्रमुख आख्यायिका नमूद आहे. त्यानुसार, एकदा परशुराम ऋषी कैलास पर्वतावर भगवान शंकरांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी महादेव तपश्चर्येत मग्न असल्याने गणेशाने त्यांना थांबवले. यामुळे परशुराम संतप्त झाले. संतापाच्या भरात परशुराम आणि गणेशामध्ये युद्ध झाले.

या युद्धादरम्यान परशुरामाने आपल्या परशूने (कुऱ्हाड) प्रहार केला आणि त्या प्रहारामुळे गणपतीचा एक दात तुटला. गणेशाला तीव्र वेदना झाल्या आणि ते विव्हळून गेले. पुत्राचे हे दुःख पाहून माता पार्वती रागाने परशुरामाला शाप द्यायला सज्ज झाल्या. परंतु लगेचच परशुरामाने आपली चूक मान्य केली, पार्वतीची क्षमा मागितली आणि गणपतीला आपल्या तपश्चर्येचे सामर्थ्य, ज्ञान व शक्ती अर्पण केले. त्या दिवसापासून गणेशाला ‘एकदंत’ ही उपाधी लाभली.

कार्तिकेयाशी संबंधित दुसरी कथा

गणपतीचा दात तुटण्याबाबत दुसरी एक आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, एकदा कार्तिकेय आपल्या कार्यात मग्न होता. मात्र गणेश वारंवार त्याच्या कामात अडथळे निर्माण करत होते. रागाच्या भरात कार्तिकेयाने गणेशाचा एक दात तोडला.

नंतर भगवान शंकरांच्या हस्तक्षेपाने कार्तिकेयाने गणपतीला तो दात परत दिला. मात्र त्यावेळी शंकरांनी गणेशाला सांगितले की हा तुटलेला दात त्यांनी नेहमी आपल्या हातात धारण करावा. त्यामुळे आपण अनेक गणेशमूर्तींमध्ये पाहतो, की बाप्पाच्या हातात दातासारखी वस्तू दिसते.

महाभारत लेखनाची कथा

गणपतीच्या एकदंती स्वरूपाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध कथा म्हणजे महाभारत लेखन. महर्षी व्यासांनी गणेशाला महाभारत लिहून घ्यायला बसवले होते. मात्र लेखनाच्या घाईगडबडीत गणेशाचा लेखणी (पेन) तुटला. तेव्हा अखंड लेखन थांबू नये म्हणून गणपतीने स्वतःचा एक दात तोडला आणि त्याच दाताने लेखन पुढे सुरू ठेवले. ही कथा देखील ‘एकदंत’ या नावाचे स्पष्टीकरण देते.

भक्तांमध्ये 'एकदंत' स्वरूपाचे महत्त्व

गणेशाच्या विविध नावांपैकी ‘एकदंत’ हे नाव श्रद्धाळूंमध्ये विशेष मानले जाते. या रूपामागे संयम, त्याग, ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठा दडलेली आहे. दात तुटल्यानंतरही गणपतीने ज्ञानाचा प्रसार, लेखन व कर्तव्य थांबू दिले नाही, ही शिकवण भक्तांसाठी प्रेरणादायी आहे.

त्यामुळे, परशुरामासोबतचे युद्ध असो, कार्तिकेयाचा राग असो किंवा महाभारत लेखनाची अद्भुत कथा असो – या सर्व आख्यायिकांमधून गणपतीचे ‘एकदंत’ स्वरूप भक्तांच्या मनात अधिक भक्तिभावाने घर करून राहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde: संगमनेरमध्ये शिंदे यांच्या रॅलीत शिवसैनिकांमध्ये गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Donald Trump : ट्रम्पच्या आदेशानंतर युक्रेनचा रशियावर मध्यरात्री हल्ला; युद्धस्थितीत तणाव शिगेला

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का दिला जातो; जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2025 : गणेशपूजेत दुर्वा अर्पणाची योग्य पद्धत; जाणून घ्या धार्मिक महत्व