मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप का घेतली नाही? असा सवाल मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर 27 फेब्रुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत दिले होते. मात्र अजून निवडणूक घेण्यात आलेल्या नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे.
या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.