ताज्या बातम्या

Crime News : भयंकर! पत्नीनेच रचला पतीला मारण्याचा कट; वचनपूर्ती न केल्याने पतीवर केला हल्ला

अमरावतीमध्ये लग्नापूर्वी दिलेले वचन न पाळल्याचा बदला घेण्यासाठी एका पत्नीने तिच्या पतीवर हल्ला करण्याचा कट रचला.

Published by : Rashmi Mane

अमरावतीमध्ये लग्नापूर्वी दिलेले वचन न पाळल्याचा बदला घेण्यासाठी एका पत्नीने तिच्या पतीवर हल्ला करण्याचा कट रचला. नवऱ्याला मामा आणि दोन तरुणांनी मारहाण केली. महाराष्ट्रातील अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीवर संतापलेल्या अवस्थेत त्याला धडा शिकवण्यासाठी मारण्याचा कट रचला. पत्नीने फक्त 1200 रुपयांमध्ये स्वतःच्या पतीवर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली. पतीने लग्नापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, या रागातून पत्नीने हे पाऊल उचलले.

हे भयानक षड्यंत्र मोर्शीच्या येरला गावातील रहिवासी असलेल्या पत्नी ममता अजय राठी यांनी रचले. ममताने तिचे मामा चेतन टँक यांची मदत घेतली आणि तिच्या पतीला मारहाण करण्याची योजना आखली. चेतनने त्याचे दोन मित्र करण मुंडाणे आणि स्मित बोबडे यांना सोबत घेत अजय राठीवर हल्ला केला.

अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. अजय राठी हे त्यांची पत्नी ममता यांच्यासोबत बाईकवरून जात होते. तेव्हा तोंड झाकलेले दोन लोक वाटेत आले आणि त्यांनी त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला. अजयला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्याकडून 95,000 रुपयेही लुटण्यात आले.

तपासादरम्यान असे उघड झाले की, अजयला मारहाण आणि लुटण्याचा संपूर्ण कट त्याच्याच पत्नीने रचला होता. हल्ल्यासाठी ममताने आरोपींना फक्त 1200 रुपये दिले होते. कारण लग्नापूर्वी तिला तिच्या पतीकडून फक्त 15,000 रुपये मिळाले होते. तर 25,000 रुपयांचे आश्वासन होते. याचा राग येऊन तिने हा कट रचला.

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला आणि एकामागून एक आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितले की, ममताने म्हटले होते की ती एका प्रभावशाली कुटुंबातील आहे आणि कोणीही तिला इजा करू शकत नाही.

खोलापुरी गेट पोलिसांनी ममता राठी, तिचे मामा चेतन टँक आणि त्यांचे दोन साथीदार करण मुंडाणे आणि स्मित बोबडे यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा