ताज्या बातम्या

BJP President : मराठी माणूस होणार भाजप अध्यक्ष? मुख्यमंत्री फडणवीसांसह ‘या’ नावांची चर्चा

देशाची सर्वात मोठी पार्टी भाजपला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Published by : Varsha Bhasmare

देशाची सर्वात मोठी पार्टी भाजपला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपमधील अनेक मोठ्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली असून या बैठकीत नवीन अध्यक्षाच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या बैठकीत भाजपने उत्तर प्रदेश अध्यक्षाचे नाव अंतिम केले असून पुढील काही दिवसात याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, विद्यमान अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि भाजपचे सरचिटणीस बीएल संतोषबुधवारी एकामागून एक झालेल्या बैठकांना उपस्थित होते.

काही मीडिया रिपोर्ट्नुसार, भाजप 15 डिसेंबरपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड करु शकतो. तर दुसरीकडे नवीन अध्यक्ष कधी निवडला जाईल याबाबत भाजपने अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र डेक्कन क्रॉनिकलमधील वृत्तानुसार, पुढील वर्षी, म्हणजेच 2026 मध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका असल्याने, अनेक नेत्यांचा असा विश्वास आहे की या निवडणुकांपूर्वी नवीन अध्यक्ष पक्षाला मिळणार. 2026 मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

अध्यक्षपदासाठी या नावांची चर्चा

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी आतापर्यंत कोणाचेही नाव अंतिम झालेले नाही पण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे या शर्यतीत महिला नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, डी. पुरंदेश्वरी आणि वनती श्रीनिवासन आघाडीवर आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर प्रधान यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. प्रधान हे बिहार निवडणूक प्रभारी होते. तर दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नड्डा यांचा कार्यकाळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच संपला आहे. अनेक वेळा त्यांना नंतर मुदतवाढ देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा