Ravichandran Ashwin : अश्विन सोडणार सीएसके? Youtube शोमध्ये संजू सॅमसनसमोरच दिलं खरं उत्तर Ravichandran Ashwin : अश्विन सोडणार सीएसके? Youtube शोमध्ये संजू सॅमसनसमोरच दिलं खरं उत्तर
ताज्या बातम्या

Ravichandran Ashwin : अश्विन सोडणार CSK? Youtube शोमध्ये संजू सॅमसनसमोरच दिलं खरं उत्तर

आर. अश्विनने सीएसके सोडण्याच्या चर्चांना दिलं मिश्किल उत्तर, संजू सॅमसनसोबत मजेशीर संवाद.

Published by : Team Lokshahi

Ravichandran Ashwin : आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संघबदल आणि खेळाडूंच्या ट्रेडबाबत जोरदार चर्चा सुरू असताना, आर. अश्विन आणि संजू सॅमसन यांची नावे विशेष चर्चेत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनावर नाराज असून फ्रेंचायझी सोडण्याची किंवा ट्रेड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आर. अश्विन स्वतःहून चेन्नई सुपर किंग्सपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या चर्चांना अखेर अश्विननेच उत्तर दिलं असून त्याने या अफवांना मिश्किल अंदाजात पूर्णविराम दिला आहे.

आर. अश्विनने नुकत्याच ‘कुट्टी स्टोरीज विथ अॅश’ या युट्यूब शोच्या टीझरमध्ये या विषयावर प्रतिक्रिया दिली. या भागात अश्विनसोबत संजू सॅमसनदेखील सहभागी आहे. टीझरमध्ये अश्विन म्हणतो, “मला तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. पण त्यापूर्वी मी विचार केला की, मी थेट माझ्याशीच ट्रेड करतो. मी केरळमध्ये राहण्यास खूश आहे. खूप साऱ्या अफवा पसरल्या आहेत, पण मला स्वतःलाच याबद्दल काही माहिती नाही. म्हणून मी ठरवलं की तुम्हालाच विचारू – जर मी केरळमध्ये राहिलो आणि तुम्ही चेन्नईला परत गेलात तर?”

अश्विनच्या या मिश्किल वक्तव्यावर संजू सॅमसन हसून प्रतिक्रिया देतो आणि हा मजेशीर संवाद सोशल मीडियावर व्हायरल होतो. या छोट्या टीझरमधूनच अश्विनने स्पष्ट केलं की सध्या सीएसके सोडण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आणि त्याच्याकडे अशा अफवांबाबत ठोस माहितीही नाही.

दरम्यान, आयपीएल 2026 हंगामासाठी सर्व फ्रेंचायझींनी संघबांधणीची तयारी सुरू केली आहे. काही खेळाडूंना रिलीज करण्याची तर काहींना टिकवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच अश्विन आणि सॅमसनच्या नावाभोवती निर्माण झालेली ही चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये अधिकच रंगत आणणारी ठरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा