देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून कायम करण्यात देत आहे. याच पक्षाला पुढील आठवड्यात नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्ष पदाची घोषणा करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.