ताज्या बातम्या

बीड हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच एका मंचावर येणार? चर्चांना उधाण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.

Published by : Siddhi Naringrekar

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार आहेत.

आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यानिमित्ताने महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळणार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला