ताज्या बातम्या

Gautami Patil : गौतमी पाटीलला अटक होणार?

पुण्यातील एका अपघात प्रकरणी कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी नृत्यांगना तसेच अभिनेत्री गौतमी पाटील हिला थेट अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • गौतमी पाटीलला अटक होणार?

  • पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली आहे.

  • नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका अपघात प्रकरणी कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी नृत्यांगना तसेच अभिनेत्री गौतमी पाटील हिला थेट अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली आहे. तसेच कोथरूड चे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र हे प्रकरणं नेमकं काय जाणून घेऊ…

नेमकं प्रकरण काय?

30 सप्टेंबरला पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

मात्र या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. यासाठी ठिय्या आंदोलन केले. कारण पोलिसांनी गौतमीला चौकशीसाठी 30 सप्टेंबरला बोलावल्याची माहिती होती. पण ती चौकशीसाठी न येता शो करत महाराष्ट्रामध्ये फिरत होती. त्यामुळे गौतमीला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा