मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात नाशिक महानगरपालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या सूचीबद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “दक्षिणेची गंगा म्हणून गौरवली जाणाऱ्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक व गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्साह प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘विकास भी, विरासत भी’ ही भूमिका आमच्यासाठी दिशादर्शक आहे.” या कार्यक्रमाला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. गोविंदराज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एमडी आशिष चौहान, ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि मनपा आयुक्त मनिषा खत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरात विविध पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. राज्य शासनाने नगरविकास विभागामार्फत अनेक कामे वेगाने राबवली असून, *कुंभाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अबाधित ठेवत आधुनिक विकास साधला जाणार आहे.* नाशिक परिसरातील रामायणातील स्थळे, गोदावरीचे धार्मिक स्थान आणि तीची स्वच्छता यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फडणवीस म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी यापूर्वी बॉण्डद्वारे निधी उभारला होता. नाशिकच्या ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ला मिळालेला चौपट सबस्क्रिप्शन* हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विश्वासार्हतेचा पुरावा आहे. राज्यातील १५ महापालिका योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यास अशाच प्रकारे खुले बाजारातून निधी उभारू शकतात, असे त्यांनी सांगितले. यामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा पायाभूत सुविधांचा निधी आणखी सोप्या मार्गाने उपलब्ध होईल. तसेच एनएसईमार्फत मिळणाऱ्या २६ कोटींच्या प्रोत्साहन निधीमुळे मनपावर येणारा व्याजभार शून्याच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.
ऊर्जा कंपन्या NSE वर आणण्याची तयारी
यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात महापारेषण (MSETCL), त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या वीज कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल आणि एनएसईचा अनुभव या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
थोडक्यात
मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात नाशिक महानगरपालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या सूचीबद्ध करण्यात आला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “दक्षिणेची गंगा म्हणून गौरवली जाणाऱ्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक व गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्साह प्रेरणादायी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘विकास भी, विरासत भी’ ही भूमिका आमच्यासाठी दिशादर्शक आहे.”