ताज्या बातम्या

Ashish Shelar : एल्फिन्स्टन पुलाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार ; आशिष शेलार यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करु, अशी ग्वाही मंत्री शेलार यांनी रहिवाशांना दिली.

Published by : Shamal Sawant

एल्फिस्टन पुलाच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली.

एल्फिस्टनचा जुना पुल तोडून त्याजागी नवीन पुल उभारण्यात येणार आहे.या कामात तेथील दोन इमारतींना इजा पोहोचू शकते. तसेच परिसरातील नागरिकांना या तोडकाम आणि बांधकामा दरम्यान काही गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. या बाबत तेथील रहिवाशांनी वांद्रे कार्यालयात आज मंत्री ॲड आशिष शेलार यांची भेट घेऊन समस्या मांडल्या, त्या समजून घेऊन याबाबत एम एम आर डी ए च्या अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करु, अशी ग्वाही मंत्री शेलार यांनी रहिवाशांना दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा