ताज्या बातम्या

Sugar Price Hike : राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का?

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साखरेची एमएसपी अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची (Sugar Price Hike) दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण

  • राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार

  • भारताचा साखरेचा साठा वाढणार

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साखरेची एमएसपी अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची (Sugar Price Hike) दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारडे शिफारस केल्याची माहिती आहे.

दरम्यान, सध्या सारखेचा दर 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. तो 4100 रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी असल्याचे बोललं जात आहे. तर हा निर्णय झाल्यास याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल. या संदर्भात 20 ऑक्टोबरला राज्य सरकारचे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयावर काय पाऊले उचली जातात आणि राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारताचा साखरेचा साठा वाढणार

भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2025-26 या मार्केटिंग वर्षात (1 ऑक्टोबरपासून) उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर 28.5 ते 29 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो या वर्षी 28 दशलक्ष मेट्रिक टन होता. भारत नवीन विपणन वर्षाची सुरुवात 5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या सुरुवातीच्या साठ्याने करेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला 8 दशलक्ष मेट्रिक टन होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा