ताज्या बातम्या

Gold Rate : काही दिवसांत सामान्यांना सोन्याचे दागिने परवडणार की नाही?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Rate) भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदी अशीच भरारी घेणार का? असे विचारले जात आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • पुढच्या काही दिवसांत सोन्याचा भाव काय असेल?

  • लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात

  • सोन्याचा भाव सप्टेंबर महिन्यात 10 टक्क्यांनी वाढला

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Rate) भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदी अशीच भरारी घेणार का? असे विचारले जात आहे. सोने आणि चांदी या मौल्यवान धातुंची किंमत चांगलीच वाढत आहे. आता तर सामान्यांना सोन्याचे दागिने परवडणार की नाही? अशी परिस्थिती झाली आहे. सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत सोन्याचा भाव काय असेल? असे आवर्जुन विचारले जात आहे.

तसं पाहायचं झालं तर सोन्यात गुंतवणूक गेल्या दिवळीमध्ये केलेल्या पैशांचे मूल्य वाढले आहे. सोन्याचा भाव सप्टेंबर महिन्यात 10 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सोनं अशीच झेप घेण्याच शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच ते सहा वर्षात सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव वाढलेलाच आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव वाढतो, असे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळालेले आहे. ऑक्टोबर महिन्याचीही अशीच स्थिती आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा भाव वाढल्याचेच पाहायला मिळालेले आहे. सोन्याचा भाव सरासरी 2.58 टक्क्यांनी सप्टेंबर महिन्यात वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्याचे उर्वरित दिवस तसेच पुढच्या काही काळात सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा