ताज्या बातम्या

Monsoon : 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार ?

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार

  • 29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर

  • वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र, दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस 2 ते 7 ऑक्टोबर अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2025 पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. पाऊस आणि वाऱ्यापासून काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, कृषी विभागाकडून असे आवाहन करण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर 2025 पासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे राज्यातून 8 ऑक्टोबर 2025 पासून मान्सून निरोप घेईल. त्यानंतर संपूर्ण राज्यातून मान्सून पुढच्या काही दिवसातच निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात धो धो पाऊस कोसळला होता.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, वाशिम, नाशिक, ठाणे,रायगडसह मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक जिल्ह्यात रस्त्यांवर सखल भागात पाणी साचलं होतं आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसच काही ठिकाणी वीजेचा लपंडावही सुरु होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mohan Bhagwat : Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवतांचं महत्वपूर्ण भाष्य

Dussehra : दसरा सण कशामुळे साजरा होतो?

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार

Devendra Fadnavis : श्रीक्षेत्र भगवानगडाला वनविभागाची चार हेक्टर जागा देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा